Pankaja Munde says I have 1825 days in power now
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याकडे आता सत्तेचे 1825 दिवस राहिले आहेत. जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहणार आहे. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही, त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल.
बीड : पाटोदा तालुक्यातील श्री श्रेत्र मिराबाई संस्थान आईसाहेब संस्थान महासांगावी येथे संत मिराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, माझ्याकडे आता सत्तेचे 1825 दिवस राहिले आहेत. जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहणार आहे. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही, त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. (Pankaja Munde says I have 1825 days in power now)
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणामध्ये आणि धर्म कारणांमध्ये एकमेकांबरोबर त्यांचे नाते असले पाहिजे, पण तेवढीच वृत्ती पण असली पाहिजे. राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून चालत असते. बीड जिल्ह्यातले 25 ते 50 हजार कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारून आल्याचे समजते. याचा अर्थ पुढचे पाप करायला ते मोकळे झालेत का? असा प्रश्न उपस्थित करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला साक्षात भगवान बाबांचे दर्शन होते. मी स्वतः भगवान बाबा पाहिले नाहीत, मात्र अनेक काहण्या ऐकल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा मुलगा दहावीला नापास, ठाकरेंनी सांगितला शाळेतला किस्सा
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे, कुणाची मिंधी नाही. जो पर्यंत लोक सांगतील मी काम करणार आहे. जनता जेव्हा नाही म्हणतील तेव्हा मी घरी बसेन. पण माझ्या वडिलांनी दुःख भोगलेय त्या कष्टाबद्दल मला आदर आहे. मी गुंडाला गुंड आहे आणि बंडाला बंड आहे, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. माझ्या कर्मभूमीकडे माझे बारीक लक्ष असते. त्यामुळे तुम्ही माझ्यावर करत असलेल्या प्रेमाची किंमत कशातच मोजू शकत नाही, असे विधानही त्यांनी केले.
माझ्याकडे आता सत्तेचे 1825 दिवस
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी मंत्री झाले काय? आणि नाही झाले काय? मला काही फरक पडत नाही. कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहणार आहात. परंतु मंत्रिपदामुळे अधिकार येतात. माझ्याकडे आता 1825 दिवस सत्तेचे आहेत. वरचे 225 दिवस असेच जातील. त्यामुळे उरलेल्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचे काम करेल, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Suresh Dhas : ज्यांनी अक्षय शिंदेची बाजू घेतली, त्यांनी आम्हाला शिकवू नये; धसांनी आव्हाडांना सुनावले
Comments are closed.