सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात, मग धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? पंकजा मुंडेंचा सवाल, सुरेश धस यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे बहीण-भावाविरोधात रान उठवले होते. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता पंकजा मुंडे यांनीही उत्तर दिले असून सुरेश धस यांची थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे दिसून येते.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? असा सवाल वारंवार सुरेश धस उपस्थित करत होते. यालाही पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे.
Comments are closed.