IND vs ENG: पंतच्या जागी कोणाला मिळणार संधी? पाचव्या टेस्टमध्ये अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

मॅंचेस्टरमध्ये भारताने चौथा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. मात्र, कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखालील संघ आता ही मालिका फक्त बरोबरीतच संपवू शकतो. पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवायची असेल, तर भारतीय संघाला हा सामना जिंकणं अत्यावश्यक ठरणार आहे.

ओव्हलमधील या सामन्यासाठी टीम इंडियाच्या (Team india) प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. जर अर्शदीप सिंग(Arshdeep singh) किंवा आकाशदीप (Aakash Deep) पूर्णपणे फिट असतील, तर अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) बाहेर बसावं लागू शकतं. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, संघातील सर्व वेगवान गोलंदाज आता पूर्णत तंदुरुस्त आहेत. दरम्यान, रिषभ पंत (Rishbh Pant) दुखापतीमुळे पाचव्या कसोटी सामन्यात उपलब्ध नाही. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला (Dhruv jurel) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

Comments are closed.