IND vs ENG: लाईव्ह सामन्यादरम्यान अंपायरवर का भडकला रिषभ पंत? रागात चेंडू फेकला!
हेडिंग्लेमध्ये खेळला जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खूप बदल पाहायला मिळत आहेत (Test Series IND vs ENG) . कधी सामन्यामध्ये इंग्लंड तर कधी टीम इंडिया (Team india) पुढे जाताना दिसत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाने 2 विकेट्स मिळवल्या होत्या. यामध्येच भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत आणि कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) अंपायर क्रिस गैफनी यांच्याकडे एक मागणी केली. ज्याची मागणी अंपायरने ऐकली नाही, यानंतर लाइव्ह सामन्यात रिषभ पंत खूप रागात दिसला.
हेंडिंग्ले कसोटी सामन्यात एका वेळी इंग्लंड संघ खूप वेगाने धावा करत होता. हॅरी ब्रूकने (Harry Brook) प्रत्येक भारतीय गोलंदाजाविरुद्ध शानदार पद्धतीने गोलंदाजी केली. तसेच कर्णाधार बेन स्टोक (Ben Stocks) सुद्धा चांगला खेळत होता. त्याचवेळी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि कर्णधार गिलने अंपायरकडे खराब झालेला चेंडू बदलण्याची मागणी केली. अंपायरचं म्हणणं होतं की, चेंडू तेवढा खराब झालेला नाही की त्याला बदलावा लागेल. अशा परिस्थितीत उपकर्णधार रिषभ पंतला राग आला आणि त्याने अंपायर समोरच चेंडू फेकला. जे पाहून सर्व प्रेक्षक आवाज करू लागले, त्यानंतर रिषभने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवले.
इंग्लंड संघाने 5 विकेट्स गमावून 286 धावा केलेल्या आहेत. हॅरी ब्रूकने 46 तसेच जेमी स्मिथ (Jemi Smith) 5 वर फलंदाजी करत आहे.
Comments are closed.