Parbhani News – निर्माणाधीन हनुमान मंदिराचे छत कोसळले; ३० हून अधिक भाविक ढिगाऱ्याखाली दबले; काही जणांचा मृत्यू झाल्याची भिती
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. श्रीक्षेत्र यशवाडी येथील हुनमान मंदिराचे बांधकाम सुरू आहे. शनिवार (20 जून 2026) असल्यामुळे मारुतीरायाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच दरम्यान, दुपारी 3 च्या सुमारास मंदिराचे छत अचानक कोसळलं आणि अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याचे बोलले जात आहे. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मात्र, आज बांधकाम सुरू असतानाच मंदिराचा काही भाग कोसळल्याने अपघात घडला आणि भाविकांची एकच धावपळ झाली. घटनास्थळी उपस्थित स्थानिकांनी तात्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी मोहिम सुरू केली. तसेच घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग, आपत्कालीन यंत्रना तसेच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून भाविकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेमका अपघात कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Comments are closed.