Parenting Tips : अशी लावा मुलांना अभ्यासाची गोडी
मुलाच्या विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी, पालक त्यांना अभ्यास करण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असतात. पालक नेहमी मुलांना चांगल्या शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना एक्स्ट्रा क्लासेस आणि इतर सर्व आवश्यक गोष्टी देतात जेणेकरून मूल परिश्रमपूर्वक अभ्यास करू शकेल आणि त्याचे शिक्षण पूर्ण करू शकेल. मात्र बऱ्याचदा मुलांचे मन मात्र अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रस घेते. बऱ्याच मुलांना अभ्यासात रस नसतो. अनेकदा ते पालकांच्या सांगण्यावरून अभ्यास करायला बसतात खरे पण त्यांचे लक्ष अभ्यासात नसते. अनेक वेळा पालक आपल्या मुलांवर ओरडून त्यांच्यावर अधिक दबाव आणतात. मात्र फटकारल्याने किंवा जबरदस्तीने शिकवल्याने मुलाची अभ्यासात आवड वाढत नाही.
प्रोत्साहन द्या
मुलांना त्यांच्या पालकांकडून कौतुकाची अपेक्षा असते. पालकांकडून प्रशंसा ऐकण्यासाठी ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा करतातदेखील. मात्र पालक अनेकदा आपल्या मुलांची इतरांशी तुलना करून त्यांचे मनोबल कमी करतात. असे केल्याने मुलाचे मनोबल खच्ची होऊ शकते. मुलामध्ये सतत दोष शोधण्याऐवजी आणि त्याची इतरांशी तुलना करण्याऐवजी, त्याची स्तुती करा. त्याला कौतुकाने प्रोत्साहन मिळेल आणि तो त्याच्या कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकेल.
दबाव आणू नका
मुलांना गोष्टी समजावून सांगणे आणि त्यांच्यावर काहीतरी करण्यासाठी दबाव आणणे यात फरक आहे. त्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांच्यावर सतत अभ्यासाचा दबाव आणल्याने त्याच्या मुलावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. यामुळे मुलाला अभ्यासाचे ओझे वाटू लागते. म्हणून, त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणू नका; मुलांना अभ्यासातील कठीण गोष्टी खेळकर पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
दिनक्रम बनवा
तुमच्या मुलासाठी एक चांगला दिनक्रम आखा. नियोजन करून, तुम्ही तुमच्या मुलाला अभ्यासासाठी प्रोत्साहित करू शकता. दररोज अभ्यास करण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि अभ्यासाला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा. मुलांना सलग 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करायला लावू नका. त्यानंतर त्यांना थोडा ब्रेक टाईम द्या.
योग आणि ध्यान
मुलांना त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाभ्यास करायला लावा. याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि मुलाचे मन अभ्यासापासून विचलित होत नाही. योगासोबत चांगला आहार घेतल्याने मुलांना लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
हेही वाचा : Beauty Tips : उन्हाळ्यात हे ड्रिंक्स देतील नैसर्गिक ग्लो
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.