परिणीती-राघवाच्या मुलाचे आशीर्वाद
वृत्तसंस्था/ अमृतसर
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांना दिवाळीच्या उत्सवादरम्यान पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. परिणीती आणि राघव यांनी यासंबंधीची आनंददायी वार्ता सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुत्ररत्न झाल्याने आम्ही कुटुंबीय खूप आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आई आणि बाळ या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती व्हायरल करण्यात आली आहे.
24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमधील लिला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव विवाहबंधनात अडकले होते. आता लग्नानंतर दोन वर्षांनी ते आई-बाप झाले आहेत. त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र आणि प्रमुख राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. 2022 मध्ये ‘चमकीला’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. परिणीती पंजाबमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना राघव तिला भेटायला आल्यापासून दोघांची जवळीक वाढली होती.
Comments are closed.