Parli Crime : परळी औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले
क्राईम न्यूज बोला: परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत्यामुळे. विद्युत निर्मिती केंद्रात असलेल्या कुलिंग टावर ते मेटकॉंन टॉवर परिसरात स्क्रॅप साहित्य आणि स्क्रॅप चोरून (Crime News) नेत असताना कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी एका तरुणाला पकडल्याची घटना घडलीहे. वैभव मोठे असे या तरुणाचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेले अन्य चार जण इथून पसार झालेत. या प्रकरणी पाच जणाविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फरार व्यक्तींचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. (परळी थर्मल पॉवर प्लांटमधील भंगार चोरी)
Parli Crime News : पाचही जण सुरक्षा भेदून दुचाकी आणि ऑटोसह केंद्रात दाखल
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रासारख्या अतीसंवेदनशील परिसरात हे पाचही जण सुरक्षा भेदून दुचाकी आणि ऑटोसह हे पाच जण दाखल झाल्याने विद्युत निर्मिती केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्युत केंद्रात प्रवेश करण्यासाठी गेट पासची आवश्यकता असते. विशेष म्हणजे आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची झाडाझडती घेऊन आत सोडले जाते. असे असतानाही पाच व्यक्ती दुचाकी आणि ऑटोसह विद्युत निर्मिती केंद्राच्या आत कसे गेले? याची चर्चा आता होऊ लागली आहे.
Scrap theft in Parli Thermal Power Plant : पाच जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या चोरीसाठी वापरलेली मोटार सायकल आणि ऑटो रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध प्रारंभ केला आहे. फक्त या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.