पारोमिता मुखर्जीला विजेतेपद; उमा आणि वाणी माय-लेकींची ऐतिहासिक कामगिरी
चेंबूर येथील बीपीजीसी मैदानावर पार पडलेल्या १४व्या डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुल्या हौशी गोल्फ स्पर्धेत बेंगळुरूच्या पारोमिता मुखर्जीने आपले वर्चस्व गाजवत मानाची ‘महिंद्रा ट्रॉफी’ पटकावली. अंतिम फेरीत पारोमिताने ७२ गुणांसह एकूण २३३ गुणांची नोंद करत मुंबईच्या उमा मेननला पराभूत केले.
या स्पर्धेत मुंबईच्या माय-लेकींची जोडी आकर्षणाचे केंद्र ठरली. अनुभवी उमा मेनन यांनी २३७ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर त्यांच्याकडून प्रेरणा घेत मुलगी वाणी मेननने सिल्व्हल डिव्हिजनमध्ये सरस कामगिरी करत ‘लेफ्टनंट कर्नल हरभजन सिंग ट्रॉफी’ जिंकली. एकाच स्पर्धेत आई आणि मुलीने करंडक जिंकण्याची ही दुर्मिळ कामगिरी आहे.
कांस्य विभागात सिंथिया संधूने ‘आशा शाह ट्रॉफी’वर नाव कोरले. कॅप्टन विजया सहजवाला यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
Comments are closed.