पॉवर ऑफ अॅटर्नीच्या प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही आणि फोटो; कुंभार व दमानियांचा दावा;
मुंढवा सरकारी जमीन विक्री घोटाळा प्रकरणी जमीन व्यवहारातील पॉवर ऑफ अॅटर्नीमधील प्रत्येक पानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची सही आणि पह्टोदेखील आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे पीए आणि ओएसडी यांचा सहभाग असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय पुंभार व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यांनी कागदपत्रे आणि व्हॉट्सअॅप चॅटही दाखवले.
दमानिया आणि पुंभार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत कागदपत्रांचा हवाला देऊन पार्थ पवारांसह संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कारवाई न झाल्यास पुन्हा खारगे समितीसमोर म्हणणे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष बाब म्हणजे ही संबंधित कागदपत्रे या प्रकरणातील संशयित पार्थ पवार यांचा मामेभाऊ आणि त्यांच्या अमेडिया पंपनीतील एक टक्का भागीदार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचे वकील असलेल्या तृप्ती ठाकूर यांनीच आपल्याला पाठविल्याचे दमानिया यांनी सांगितले.
अंजली दमानिया म्हणाल्या, 2021मध्ये झालेल्या मुंढवा जमिनीच्या पॉवर ऑफ अॅटर्नीमध्ये प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा पह्टो आहे. अॅड. तृप्ती ठाकूर यांनी हे सर्व पुरावे पाठवले असून यामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांचे चॅटिंगही समोर आले आहे. यामध्ये ईओडब्ल्यू अधिकारी वाघमारे यांचा नंबरही पाठवण्यात आला होता. हे सर्व पुरावे पोलिसांकडे असूनही पार्थ पवारांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
या व्यवहारात अजित पवार यांचे पीए आणि तीन ओएसडींचा थेट सहभाग होता. यामध्ये संतोष ढाकणे, राम चौबे, संतोष हिंगणे आणि विकास पाटील या अधिकाऱयांच्या नावांचा समावेश असून त्यांचे चॅटिंगही समोर आले आहे, असे सांगून दमानिया यांनी संतोष ढाकणे यांचा यात पूर्ण सहभाग असून चौकशीसाठी हजर राहण्याच्या पत्रानंतर या अधिकाऱयांचे सतत कॉल्स येत होते, असा दावा त्यांनी केला. जर पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला नाही आणि अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करणार आहोत. मी पुन्हा खारगे समितीसमोर उभी राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
अजित पवारांना सर्व गोष्टींची कल्पना; पण मुख्यमंत्र्यांचे त्यांना संरक्षण!
गेल्या 5–6 वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. एकाच नोटरीकडून सर्व कागदपत्रे बनवून घेण्यात आली आहेत. 25 मे 2021 रोजी हा व्यवहार झाला असून सर्व कागदपत्रे सरकार दरबारी उपलब्ध आहेत. अजित पवारांना या सर्व गोष्टींची कल्पना होती; परंतु मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री त्यांना संरक्षण देत आहेत, असा आरोप विजय पुंभार यांनी केला.
आम्ही केलेल्या आरोपांवरून त्यांनी खुशाल आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करावा, आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत. मात्र त्याआधी या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विजय पुंभार यांनी केली.
आय
Comments are closed.