प्रवाशाला मारहाण, पायलट निलंबित.

दिल्ली विमानतळावरील घटना : रक्ताळलेल्या चेहऱ्याचे फोटो व्हायरल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर एका ऑफ ड्युटी पायलटने प्रवाशाला मारहाण केल्याचे घटना निदर्शनास आली आहे. या घटनेनंतर अंकित दिवाण नामक प्रवाशाने सोशल मीडियावर मारहाणीसंबंधी माहिती शेअर करत पायलटच्या कपड्यांचे आणि स्वत:च्या रक्ताळलेल्या चेहऱ्याचे फोटो पोस्ट केले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी एअर इंडिया एक्स्प्रेसने पायलट कॅप्टन वीरेंद्र सेजवाल यांना निलंबित केले. सदर पायलट ड्युटीवर नव्हता असे सांगतानाच सद्यस्थितीत आम्ही त्याला सेवेतून काढून टाकले आहे, अस एअरलाईन्सने स्पष्ट केले. याप्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले. या घटनेनंतर प्रवासी अंकित दिवाणने आणखी एक पोस्ट व्हायरल करत त्याच्यावर प्रकरण संपवण्यासाठी दबाव आणण्यात आला आणि त्याला पत्र लिहिण्यास भाग पाडण्यात आले असे म्हटले आहे. याप्रकरणी एअरलाईनकडून योग्य तपास केला जावा अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.

Comments are closed.