ओडिशामध्ये बसमधील प्रवाश्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला

5 जण जखमी : रुग्णालयात उपचार सुरू

वृत्तसंस्था/ पुरी

ओडिशातील पुरी येथे बसमधील प्रवाशांवर धारदार अस्त्राने हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हल्लेखोरही सामील असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस हर्षपडाहून सत्यवादती सुकलाच्या दिशेने जात असताना एक युवक बसमध्ये घुसला आणि प्रवाशांवर धारदार अस्त्राने हल्ला करू लागल्याने खळबळ उडाली.

या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. हल्लेखोराला काही प्रवाशांनी विरोध करत घेरले आणि मारहाण केली. काही लोकांनी पोलिसांना कळविल्यावर हल्लेखोर लोकांच्या तावडीतून वाचू शकला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हल्लेखोराचे नाव तपन भोई असून तो धारदार अस्त्रासह बसमध्ये चढला होता तसेच कुठल्याही ठोस कारणाशिवाय प्रवाशांवर त्याने हल्ला केला होता असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर युवकाचा काही प्रवाशांसोबत जुना वाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसमार्गावरील सुरक्षा वाढवत गस्त तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.

 

Comments are closed.