रोहित-विराटच्या वनडे भविष्यावर पॅट कमिन्सचा धक्कादायक दावा, म्हणाला…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे आणि पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेद्वारे रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघाच्या जर्सीत पुनरागमन करणार आहे. दोघे शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले होते. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चाहते त्यांना पुन्हा वनडे मालिकेत खेळताना पाहणार आहेत. याआधी आता पॅट कमिन्सने एक धक्कादायक विधान केले आहे. त्याच्या मते, ऑस्ट्रेलियातील ही विराट आणि रोहितची शेवटची मालिका ठरू शकते.

ऑस्ट्रेलियाचा स्टार मॅच विनर पॅट कमिन्सने अलीकडेच विराट आणि रोहितबद्दल वक्तव्य केले आहे. त्याने दोघांचे कौतुक केले, पण हेही म्हटले की कदाचित ही दोघांची शेवटची मालिका ठरू शकते. कमिन्स म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या 15 वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहेत. त्यामुळे कदाचित ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना त्यांना शेवटच्यांदा खेळताना पाहण्याची संधी मिळेल. ते भारतासाठी चॅम्पियन राहिले आहेत आणि त्यांना नेहमीच चाहत्यांकडून प्रचंड साथ मिळाली आहे. आम्ही जेव्हा त्यांच्या विरोधात खेळतो, तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि आवाज अफाट असतो.”

पॅट कमिन्स सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे आणि त्यामुळे तो भारताविरुद्धची वनडे तसेच टी20 मालिका खेळू शकणार नाही. याबाबत निराशा व्यक्त करताना तो म्हणाला, “भारताविरुद्धची पांढऱ्या चेंडूची मालिका मिस करणं ही खूप खेदाची गोष्ट आहे. मला वाटतं की प्रेक्षकांचा प्रतिसाद अफाट असेल. ऑस्ट्रेलियामध्ये आधीपासूनच उत्साह वाढत चालला आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही असा मोठा सामना मिस करता, तेव्हा निराशा वाटते.”

कमिन्स पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही अशा मोठ्या मालिकेचा भाग नसता, तेव्हा वाईट वाटतं. तुम्हाला तीनही सामने जिंकायचे असतात, पण त्याचबरोबर तुम्ही तरुण खेळाडूंनाही संधी द्यायची असते. विशेषतः त्यांना, जे मागील वर्ल्ड कपचा भाग नव्हते. उद्दिष्ट असं आहे की त्यांना खेळण्याची संधी द्यावी आणि त्यांनी काय क्षमता दाखवू शकतात, हे पाहावं.”

Comments are closed.