स्वदेशी आरोग्याची क्रांती! पतंजलीचे 2025 पर्यंत ‘आत्मनिर्भर भारत’ करण्याचे उदिष्ट, काय आहे योजन


पतंजली: भारतातील आरोग्य आणि वेलनेस क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. पतंजलीने अलीकडेच जाहीर केलं की, आयुर्वेद आणि योगामुळे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी लोकांचं जीवन सुधारलं आहे. (Patanjali) स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली पतंजली आता नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी सज्ज आहे. 2025 पर्यंत भारताला आत्मनिर्भर बनवणं आणि जगभरात भारतीय आयुर्वेदाला नवी ओळख मिळवून देणं कंपनीचं ध्येय  असल्याचं कंपनीने  सांगितलं.

पतंजलीने म्हटलंय की, “आमचं उद्दिष्ट केवळ उत्पादने विकणे नाही, तर सर्वांगीण आरोग्य, शाश्वत शेती आणि डिजिटल इनोव्हेशन यावर भर देणं आहे.” या दिशेने पुढचं पाऊल म्हणून कंपनी देश-विदेशात १० हजार वेलनेस सेंटर्स सुरू करणार आहे. या केंद्रांमध्ये योग सत्रं, आयुर्वेदिक सल्ला आणि नैसर्गिक उपचार उपलब्ध असतील. स्वामी रामदेव म्हणाले, “या उपक्रमामुळे योगाला जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळेल आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पोहोचेल.”

Patanjali: 2027 पर्यंत चार कंपन्या बाजारात

पतंजलीने सांगितलं की, “हे वेलनेस सेंटर्स डिजिटल अ‍ॅप्स आणि स्मार्ट वेअरेबल्सच्या मदतीने लोकांना घरी बसून स्वतःच्या आरोग्याचं निरीक्षण करता येईल.” कंपनीने 2027 पर्यंत आपल्या चार कंपन्यांची यादी करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे पतंजलीचा एकूण मार्केट कॅप ₹5 लाख कोटीपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. आरोग्य उत्पादनांचा बाजार सध्या 10–15 टक्क्यांनी वाढतो आहे, त्यामुळे ही पावले उद्योगाला नवा वेग देणार आहेत.

मार्केटिंगच्या दृष्टीने पतंजली 2025 मध्ये डिजिटल मोहीमांवर भर देणार आहे. युवकांना लक्ष्य करण्यासाठी YouTube Shorts, Instagram Reels आणि इन्फ्लुएंसर कोलॅबोरेशनद्वारे मोहिमा राबवल्या जातील. SEO आणि कंटेंट मार्केटिंगच्या मदतीने “Ayurvedic Health Products” सारख्या कीवर्ड्ससाठी शोध वाढवले जातील.

तसेच, पतंजली स्वतःच्या शेतांमध्ये कच्चा माल तयार करून उत्पादनांचा खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑर्गेनिक फूड्स, हेल्थ सप्लिमेंट्स आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार केला जाणार आहे. या माध्यमातून आत्मनिर्भर भारत मिशनला चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.

जागतिक भागीदारी आणि संशोधन

पतंजलीने स्पष्ट केलं आहे की, संशोधन आणि विकासात गुंतवणूक करून नवे हर्बल फॉर्म्युले विकसित केले जातील, जे वैयक्तिक आरोग्य उपाय देतील. आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी UAE, अमेरिका, आणि कॅनडा या देशांमध्ये भागीदारी केली जाईल.

पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि शाश्वत उत्पादन पद्धतींमुळे पतंजलीला ग्रीन ब्रँड बनवण्याचं स्वप्न आहे. कायद्याच्या अडचणी आणि महागाईसारख्या आव्हानांना सामोरं जावं लागेल, पण कंपनीला विश्वास आहे की स्वामी रामदेव यांच्या प्रामाणिकतेमुळे आणि पारदर्शक मार्केटिंगमुळे हे सर्व पार करता येईल.

आणखी वाचा

Comments are closed.