पवन हंस हेलिकॉप्टर अंदमानजवळ कोसळले
तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात क्रॅश लँडिंग
वृत्तसंस्था/ श्री विजयापुरम
सरकारी हेलिकॉप्टर सेवा प्रदाता कंपनी पवन हंसचे एक हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी सुमारे 9.30 वाजता अंदमान आणि निकोबारच्या मायाबंदरनजकी समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरने श्री विजयापुरम येथून सकाळी सुमारे 8.45 वाजता उ•ाण केले होते. काही तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाने समुद्रात व्रॅश लँडिंग केल्याचे प्रारंभिक तपासात आढळून आल्याचे नागरी उ•ाण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिक अणि 5 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये 3 पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश होता. सर्व प्रवासी आणि वैमानिकांना सुरक्षित वाचविण्यात आले असून त्यांना मायाबंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रॅश लँडिंगपूर्वी वैमानिकाने अधिकाऱ्यांना अलर्ट पाठविला होता. माहिती मिळताच मदत अन् बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. पवन हंस कंपनी अंदमान आणि निकोबार बेटसमुहासह दुर्गम आणि बेट क्षेत्रांमध्ये हेलिकॉप्टर सेवा संचालित करते.
Comments are closed.