पवार-शेलार गटाचे पुन्हा वर्चस्व, एमसीए निवडणुकीत 12 जागांवर संयुक्त गट विजयी

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) त्रैवार्षिक निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार गटाने एकतर्फी विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवले. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या तुफान चर्चेनंतर तयार झालेल्या या संयुक्त गटाने 16 पैकी 12 पदांवर विजय मिळवत आपला दबदबा दाखवला.

अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मंगळवारी निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱया उमेदवारांनी पवार-शेलार गट तयार करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याच गटाने आपली मुंबई क्रिकेटवर आपली पकड घट्ट करताना सर्वच महत्त्वाच्या पदांवर बाजी मारली. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी उपाध्यक्षपदावर विजय मिळवताना नवीन शेट्टी यांचा 46 मतांनी पराभव केला. सचिवपदासाठी डॉ. उन्मेष खानविलकर यांनी सहा वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा संघटनेत दमदार पुनरागमन केले. त्यांनी शाह आलम शेख यांचा 98 मतांनी दणदणीत पराभव करत विजयी पुनरागमन केले.

दोन दिवसांपूर्वी पवार आणि शेलार यांचे गट स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, मात्र दोन्ही गटांनी मंगळवारी उशिरा आपली आघाडी करत नवी यादी तयार केली. या यादीत शेवटच्या क्षणी उन्मेष खानविलकर आणि नदीम मेमन यांचाही समावेश करण्यात आला. तसेच या पॅनलमध्ये नसलेल्या नीलेश भोसले यांनी संयुक्त सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत गौरव पय्याडेचा 100 मतांनी धुव्वा उडवला. भोसले यांना 228 तर पय्याडे यांना 128 मते पडली.

नार्वेकरांचा दणदणीत विजय

शिवसेना आमदार–सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सलग दुसऱयांदा 241 मते मिळवत अॅपेक्स काwन्सिलमध्ये बाजी मारली. 9 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत संदीप विचारे यांनी सर्वाधिक 247 मते मिळवली. तेच सर्वाधिक मते मिळवून जिंकणारे उमेदवार ठरले.

९७ टक्के मतदान

एकूण 375 मतदारांपैकी 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे तब्बल 97 टक्के मतदारांनी मतदानासाठी एमसीए गाठले. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि डायना एडलजी यांचा समावेश होता.

त्रैवार्षिक निवडणुकीचा बाहेर काढणे

अध्यक्ष: अजिंक्य नाईक (बिनविरोध) उपाध्यक्ष ः जितेंद्र आव्हाड (201 मते),  नवीन शेट्टी (155); सचिव ः उन्मेष खानविलकर (२२७), शाह आलम शेख (१२९); सहसचिव: नीलेश भोसले (228),  गौरव पय्याडे (128) ; खजिनदार ः इच्छा मलिक (234), सुरेंद्र शेवाळ (119); अॅपेक्स काwन्सिल (9 जागा)ः संदीप विचारे (247), सूरज सामत (246), विघ्नेश कदम (242), मिलिंद नार्वेकर (241), भूषण पाटील (208), नदीम मेमन (198), विकास रेपाळे (195), प्रमोद यादव (186), नील सावंत (178).

Comments are closed.