पैसे दे, नाहीतर मारून टाकू! शमीला ईमेलद्वारे धमकी

टीम इंडियाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तू आम्हाला एक कोटी दे, नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आलेली आहे.
शमीचा मोठा भाऊ हसीबनुसार ही धमकी राजपूत सिंधर नावाच्या मेल आयडीवरून आली आहे. या मेलवर 1 कोटी रुपये न दिल्यास शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘पैसे दिले नाही तर आम्ही तुला मारून टाकू.’ सरकार आमचे काहीही करू शकणार नाही,’ असे मेलमध्ये लिहिले आहे.’ हसीबच्या तक्रारीवरून, अमरोहा पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. मोहम्मद शमी सध्या आयपीएलच्या 18व्या हंगामात व्यस्त आहे. तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती अमरोहाचे पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी दिली.
Comments are closed.