MPL 2025: कोल्हापूर टस्कर्सकडून कोण खेळणार? जाणून घ्या संपूर्ण स्कॉड
येत्या 4 जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीगचा अर्थात एमपीएलचा तिसरा हंगाम सुरू होत आहे. देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक महाराष्ट्र प्रीमियर लीगचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या या हंगामात रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ जेतेपदासाठी भिडताना दिसतील. या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील.
2023 च्या हंगामात उपविजेत्या ठरलेल्या कोल्हापूर टस्कर्सची या हंगामात देखील जोरदार चर्चा आहे. तेव्हा त्यांचा अझीम काझीच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी जेट्सपुढे कोल्हापूरचा निभाव लागला नव्हता. असे असले तरीही कोल्हापूरचा संघ यंदा एमपीएलची ट्राॅफी उंचावण्यासाठी मैदानावर घाम गाळताना दिसेल. त्यांचा सरावही चांगला सुरु आहे.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघ या स्पर्धेत एकूण 10 सामने खेळणार आहे. यादरम्यान साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना (7 जून) आणि शेवटचा सामना (19 जून) रोजी होणार आहे. या लीगच्या तिसऱ्या हंगामात संघाचे नेतृत्व राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) कडे असणार आहे.
एमपीएल 2025 साठी पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचा संघ- राहुल त्रिपाठी (कर्णधार), अनिकेत पोर्वाल (यष्टीरक्षक), कीर्तिराज वाडेकर, सिद्धार्थ म्हात्रे, योगेश डोंगरे, सचिन धस, अंकित बावणे, हर्ष संघवी, ऋषिकेश दौंड, श्रीकांत मुंढे, भूषण नवंंदे, मनोज यादव, हर्षल मिश्रा, उमर शाह, यश खलाडकर, श्रेयस चव्हाण, तरणजीत ढिल्लोन, सुमित मर्कळी, निहाल तुसमाड, अथर्व डाकवे
या स्पर्धेत (20 जून) रोजी क्वॉलीफायर 1 व एलिमीनेटरचे सामने होतील. तर (21 जून) रोजी क्वॉलीफायर 2चा सामना होईल. (22 जून) रोजी फायनलचा सामना खेळला जाईल.
प्रेक्षकांना मिळणार मोफत प्रवेश
MPLचे सर्व सामने तसेच WMPLचेही सर्व सामने यावेळी प्रेक्षकांना स्टेडियमवर जाऊन मोफत पाहता येणार आहे. याची माहिती यापुर्वी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही रोहित दादा पवार केले आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील.
घरबसल्या सामन्यांचा आनंद घेता येणार
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.
Comments are closed.