MPL 2025: पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे MPLचे संपुर्ण वेळापत्रक..!

महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएल 2025चा 4 जुनपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 22 जून रोजी संपणार आहे. या स्पर्धेत 34 सामने खेळवले जातील. या लीगचा हा तिसरा हंगाम असून रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ खेळताना दिसतील.

या स्पर्धेची सुरूवात गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स या सामन्याने होणार आहे. परंतु, असे असले तरी पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या संघावर सर्वांच्याच नजरा असतील. संघाने एमपीएलच्या पहिल्या हंगामात दमदार कामगिरी करत फायनलध्ये धडक मारली होती. पण फायनलमध्ये संघाला रत्नागिरी जेट्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या या तिसऱ्या हंगामात सर्वच संघ साखळी फेरीत 10 सामने खेळणार आहेत. (PBG Kolhapur Tuskers MPL 2025 Schedule – Full Match Fixtures, Dates & Timings)

चला तर मग या बातमीद्वारे आपण पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे महाराष्ट्र प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघ या स्पर्धेत एकूण 10 सामने खेळणार आहे. यादरम्यान साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना (7 जून) आणि शेवटचा सामना (19 जून) रोजी होणार आहे. या लीगच्या तिसऱ्या हंगामात संघाचे नेतृत्व राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) कडे असणार आहे.

या स्पर्धेत (20 जून) रोजी क्वॉलीफायर 1 व एलिमीनेटरचे सामने होतील. तर (21 जून) रोजी क्वॉलीफायर 2चा सामना होईल. (22 जून) रोजी फायनलचा सामना खेळला जाईल.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे MPL 2025चे संपूर्ण वेळापत्रक
7 जून, विरूद्ध रत्नागिरी जेट्स, दुपारी 2:00 वाजता
9 जून, विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स, सकाळी 9:30 वाजता
10 जून, विरूद्ध सातारा वॉरियर्स, दुपारी 2:00 वाजता
11 जून, विरूद्ध पुणेरी बप्पा, रात्री 7:00 वाजता
13 जून, विरूद्ध रत्नागिरी जेट्स, रात्री 7:00 वाजता
14 जून, विरूद्ध पुणेरी बप्पा, दुपारी 2:00 वाजता
15 जून, विरूद्ध रायगड राॅयल्स, रात्री 7:00 वाजता
16 जून, विरूद्ध ईगल नाशिक टायटन्स, दुपारी 2:00 वाजता
18 जून, विरूद्ध सातारा वॉरियर्स, रात्री 7:00 वाजता
19 जून, विरूद्ध रायगड राॅयल्स, सकाळी 9:30 वाजता

प्रेक्षकांना मोफत प्रवेश
MPLमध्ये 6 संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ साखळी फेरीत 10 सामने खेळेल. या स्पर्धेत एकूण 34 सामने होणार असून फायनल सामना (22 जून) रोजी होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टेडियमवर मोफत पहायला मिळणार आहे. WMPL देखील याच काळात होत असल्याकारणाने ते सामने देखील प्रेक्षकांना इथे पहाता येतील. तसेच आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देता येणार आहे. लीगचे हे तिसरे वर्ष असून एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी प्रेक्षकांना मोफत एंट्रीची घोषणा यापुर्वीच केली आहे, तसेच फॅन्सने मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ऑनलाईन व टीव्हीवरही सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.

Comments are closed.