PBKS vs GT: रोमांचक सामन्यात पंजाबने बाजी मारली, गुजरातचा निसटता पराभव

पंजाब किंग्सने आयपीएल 2026 मधील रोमांचक आणि अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सनी विजय मिळवत महत्त्वाची कामगिरी नोंदवली. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अखेरपर्यंत चुरस पाहायला मिळाली.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्यामध्ये कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक (39) धावा केल्या शिवाय जोस बटलरनेही 38 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही. पंजाब किंग्सकडूव विजयकुमार वैशाखने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात केवळ 34 धावा देत ही कामगिरी केली.

प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मेळ साधत, 19.1 षटकांत 163 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयात कूपर कॉनलीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली; त्याने 72 धावांची एक शानदार आणि नाबाद खेळी साकारत, संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी निकराचा लढा दिला खरा, परंतु निर्णायक क्षणी बळी मिळवण्यात सातत्य राखण्यात त्यांना अपयश आले. अखेर, पंजाब किंग्जने हा सामना 3 गडी राखून जिंकला.

Comments are closed.