पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) जाहीर केले नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, बाबर-रिझवानची 'ग्रेड ए' मधून हकालपट्टी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) (2025-26) सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर झाला आहे. यात पाकिस्तानच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना धक्का बसला आहे. विशेषतः बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना, ज्यांना आशिया कप 2025 च्या संघातून वगळण्यात आले आहे, त्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्येही मोठा फटका बसला आहे.
या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये एकही खेळाडू ‘ग्रेड ए’ मध्ये नाही. गेल्या वर्षी ‘ग्रेड ए’ मध्ये असलेले बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना खराब कामगिरीमुळे ‘ग्रेड बी’ मध्ये टाकण्यात आले आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अलीकडच्या खराब कामगिरीमुळे त्यांना हे नुकसान सहन करावे लागले आहे.
याउलट, काही खेळाडूंची कामगिरी चांगली झाल्यामुळे त्यांना प्रमोशन मिळाले आहे. अबरार अहमद, हारिस रैफ, सलमान अली आगा, सॅम अयुब, आणि शादाब खान या पाच खेळाडूंना ‘ग्रेड सी’ मधून ‘ग्रेड बी’ मध्ये स्थान देण्यात आले आहे.
12 नवीन खेळाडूंचा समावेश
यावर्षी PCB ने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये खेळाडूंची संख्या 27 वरून 30 केली आहे. या 30 खेळाडूंमध्ये 12 नवीन खेळाडूंचा समावेश आहे. यात अहमद दानियाल, फहीम अशरफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान, सलमान मिर्झा, आणि सुफयान मुकीम यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
2025-26 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट खेळाडूंची यादी:-
ग्रेड बी (10 खेळाडू): अबरार अहमद, बाबर आझम, फखर जमान, हारिस रैफ, हसन अली, मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, सलमान अली आगा, शादाब खान, आणि शाहीन शाह आफ्रिदी.
ग्रेड सी (१० खेदू): अब्दुल्लाह शफीक, फहीम अशरफ, हसन नवाज, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, नाम्स अली, साहिबजाद फरहान, साजिद खान, आानी सौद शील.
ग्रेड डी (10 खेळाडू): अहमद दानियाल, हुसैन तलत, खुर्रम शहजाद, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्झा, शान मसूद, आणि सुफयान मुकीम.
Comments are closed.