PCB चेअरमन मोहसिन नक्वीचा घमंड, टीम इंडियाला ट्रॉफी देण्याविषयी केलं वादग्रस्त वक्तव्य!
आशिया कप ट्रॉफीचा (Asia Cup Trophy) वाद पुन्हा चर्चेत आला आहे. फायनलमध्ये भारताने सामना जिंकल्यानंतर आशियाई क्रिकेट काउंसिल (ACC) चे चेअरमन आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) ट्रॉफी स्वतः सोबत घेऊन गेले होते. नक्वी सुधारणार नाहीत असे दिसत आहे आणि आता त्यांनी नवीन आदेश जारी केला आहे.
सध्या ट्रॉफी दुबईमध्ये ACC च्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे आणि नक्वी म्हणतात की, त्यांची परवानगी शिवाय ट्रॉफी कुणालाही दिली जाणार नाही.
रिपोर्ट्सनुसार सध्या ट्रॉफी दुबईतील ACC ऑफिसमध्ये आहे. मोहसिन नक्वींनी स्पष्ट आदेश दिला आहे की, त्यांच्या गैरहजेरीत ट्रॉफी कुणालाही दिली जाणार नाही, उलट तिच्या जागेवरून हलवायला पण कोणालाही परवानगी नाही. तसेच त्यांनी हे देखील सांगितले आहे की, भारतीय क्रिकेट टीम किंवा BCCI ला फक्त त्यांच्याच हातून ट्रॉफी दिली जाईल.
28 सप्टेंबरला आशिया कप (Asia Cup Final 2025 IND vs PAK) फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 विकेटने पराजित केले. फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पोस्ट-मॅच प्रेझेंटेशन उशीराने सुरू झाले, पण टीमला ट्रॉफी मिळाली नाही कारण नक्वी ती स्वतः सोबत घेऊन गेले होते.
रिपोर्टनुसार, BCCI हा मुद्दा ICC च्या बोर्ड मीटिंगमध्ये उचलणार आहे. या मीटिंगमध्ये नक्वीची निंदा होऊ शकते किंवा त्यांना ICC च्या डायरेक्टर पदावरून हटवण्याची मागणी होऊ शकते.
यापूर्वी ACC च्या बैठकीत भारताचे प्रतिनिधी राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी नक्वीला टोला लगावला होता. शुक्ला म्हणाले होते की, नक्वीला ट्रॉफी स्वतः सोबत घेण्याचा कोणताही हक्क नव्हता, कारण ही ट्रॉफी कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही, तर ACC ची आहे.
Comments are closed.