हारिस अन् साहिबजादावर बीसीसीआयने अॅक्शन घेताच पाकिस्तान चवताळला; म्हणाला, तो सूर्यकुमार यादव..
भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 एशिया कप 2025: आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. सुपर-4 सामन्यात भारताविरुद्ध गन सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानविरोधात बीसीसीआयने (BCCI) आयसीसीकडे (ICC) तक्रार दाखल केली. फरहानसोबत पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफ याचे नावही या प्रकरणात आले आहे. सामन्यादरम्यान रौफने भडकावणारे इशारे केले होते, ज्याची तक्रार देखील बीसीसीआयने केली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सुद्धा आयसीसीकडे धाव घेतली आहे आणि त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरोधात विरोध नोंदवला आहे.
हारिस अन् साहिबजादावर बीसीसीआयने अॅक्शन (BCCI Takes Action Haris Rauf and Sahibzada Farhan)
21 सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर-4 सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्या असभ्य वर्तनाबद्दल भारतीय संघाने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय संघाने रौफ आणि फरहान यांच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात, फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर त्याच्या बॅटने ”गन सेलिब्रेशन” केलं, तर संजू सॅमसनची विकेट घेतल्यानंतर हरिस रौफने आक्रमकता दाखवली.
फक्त इतकेच नाही तर हरिस रौफने भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशीही वाद घातला. या प्रकारावर बीसीसीआयने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशा घटना खेळाडूवृत्तीच्या पूर्णपणे विरोधात आहेत. आम्ही या संदर्भात अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पायक्रॉफ्ट यांना मेलद्वारे अधिकृत तक्रार पाठवण्यात आली असून त्यात रऊफ आणि साहिबजादाचा वादग्रस्त व्हिडिओही जोडण्यात आला आहे.
पीसीबीच्या सूर्यकुमार यादवविरुद्ध दोन तक्रारी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे दोन तक्रारी केल्या आहेत. एक टॉसदरम्यान पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी हस्तांदोलन न केल्याची आणि दुसरी पत्रकार परिषदेत दिलेल्या विधानाची. यावर आयसीसीच्या समितीने चौकशी केली होती. यापूर्वीही पाकिस्तानने मॅच रिफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पाकिस्तानने यूएईविरुद्धच्या सामन्यात खेळ बहिष्काराची धमकी दिली होती.
आयसीसीने सूर्याकडून मागितले उत्तर
दुसरीकडे, पीसीबीने पलटवार करत सूर्याच्यावर “स्पोर्ट्समनशिप”विरोधी वर्तनाचा आरोप केला आहे. दरम्यान, पीसीबीच्या तक्रारीनंतर आयसीसीने दोन अहवाल सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्याकडे पाठवले आहेत. त्यानंतर रिचर्डसन यांनी भारतीय संघाला एक ई-मेल पाठवला. या मेलमध्ये लिहिले आहे की, “आयसीसीकडून मला दोन अहवाल हाताळण्यासाठी पाठवले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सूर्यकुमार यादव यांनी सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनदरम्यान आणि पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांवर दोन तक्रारी दाखल केल्या आहेत.”
सर्व अहवाल आणि पुरावे तपासल्यानंतर मी या निष्कर्षापर्यंत आलो आहे की, सूर्यानं केलेले अनुचित विधानांमुळे खेळाची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आरोप आहे. या मेलमध्ये पुढे लिहिले आहे की, जर सूर्य हा आरोप मान्य करत नसतील, तर याबाबत सुनावणी होईल. त्या सुनावणीत माझ्यासोबत सूर्यकुमार यादव आणि पीसीबीचा प्रतिनिधी उपस्थित राहील.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.