बांगलादेशला बाहेर काढताच पीसीबीच्या माजी अध्यक्षाचं वादग्रस्त वक्तव्य, थेट आयसीसीवर टीकेची झोड

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आयसीसीला त्यांनी इंडियन क्रिकेट काऊन्सिल असं म्हटलं आहे. यामुळं नव्य वादाला सुरुवात झाली आहे. आयसीसीनं बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी दिली. या निर्णयावर नजम सेठी यांनी आक्षेप घेतला आहे. नजम सेठी तीन वेळा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धोरणं आणि नियम माहिती आहेत, तरी देखील त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्ताननं देखील टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला पाहिजे, या भूमिकेचं नजम सेठी यांनी काही दिवसांपूर्वी समर्थन केलं होतं.

बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. इतर क्रिकेट बोर्डांच्या तुलनेत त्यांचा प्रभाव अधिक आहे. नजम सेठी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलला बीसीसीआय चालवत असल्याचं वक्तव्य केलं. बांगलादेश टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या परवानगीनंतर टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासंदर्भात निर्णय घेईल, असं म्हटलं.

टेलीकॉम एशिया स्पोर्टस नुसार माजी पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी  बांगलादेशनं टी 20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार टाकला. यानंतर पीसीबी काय निर्णय घेतंय हे पाहावं लागेल. ते म्हणाले मोहसीन नक्वी यांना यातील बारकावे माहिती आहेत, ते योग्य निर्णय घेतील, असंही सेठींनी म्हटलं.

नजम सेठी म्हणाले की जर इतर देश पाकिस्तान सोबत आले तर आयसीसीला समजेल की ते इंडियन क्रिकेट काऊन्सिल नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आहेत.

दरम्यान, बांगलादेशनं भारतात खेळण्याबाबत अंतिम निर्णय न कळवल्यानं आम्ही स्कॉटलंडला संधी दिल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. आयसीसीनं या संदर्भात नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामुळं बांगलादेश अधिकृतपणे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.