PCBचं स्वप्न राहणार अर्धवट! युएईने पीएसएलसाठी दारं केली बंद, जाणून घ्या सविस्तर
भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणाव लक्षात घेता, अमिराती क्रिकेट बोर्डाकडून मान्यता मिळण्याची शक्यता कमी असल्याने, पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची पीसीबीची योजना स्थगित होण्याची शक्यता आहे.
अमिराती क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की बोर्ड पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अशा कोणत्याही विनंतीला नकार देऊ शकते. पीसीबीने यापूर्वीच जाहीर केले आहे की पीएसएल यूएईमध्ये असेल. यासाठी सूत्रांनी सुरक्षेच्या कारणांचा हवाला दिला. अलिकडच्या घडामोडी पाहता, अमिराती क्रिकेट बोर्ड पीसीबीला पाठिंबा देत असल्याचे संकेत देऊ इच्छित नाही आणि पीएसएलचे आयोजन केल्याने हे संकेत मिळतील.
सूत्राने सांगितले की, ‘अलीकडच्या काळात अमिराती क्रिकेट बोर्डाचे बीसीसीआयशी मजबूत संबंध आहेत. त्यांनी 2021 च्या टी20 विश्वचषक आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलचेही आयोजन केले आहे.’ दुबई हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय देखील आहे ज्याचे अध्यक्ष बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह आहेत. सूत्राने सांगितले की, “यूएईमध्ये असे बरेच दक्षिण आशियाई आहेत ज्यांना क्रिकेट आवडते. अशा तणावांमध्ये पीएसएलचे आयोजन केल्याने सलोखा बिघडू शकतो, सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि दोन्ही समुदायांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो.”
पीसीबीने (9 मे) रोजीच सांगितले की पीएसएलचे उर्वरित 8 सामने युएईमध्ये खेळवले जातील जे रावळपिंडी, मुलतान आणि लाहोरमध्ये खेळवले जाणार होते. (22 एप्रिल) रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतेक पर्यटक होते.
Comments are closed.