बाई काय हा प्रकार…लंडनमध्ये अंडरवेअर घालून फिरताहेत लोक
कडाक्याच्या थंडीत फक्त अंडरवेयरवर ब्रिटनची राजधानी लंडन येथील मेट्रो ट्रेनमधील दृश्याने साऱ्यांना धक्का बसला. रविवारी लंडनचे सरासरी तापमान 4 ते उणे 3 च्या दरम्यान होते. तरीही लंडनचे लोक मेट्रो ट्रेनमध्ये ट्राऊझर्स, पँट न घालता फिरत होते. वर गरम कपडे, कोट आणि हॅट, पायात बूट मोजे पण पँट नाहीच. फक्त अंडरवेअर. हा नेमका काय प्रकार आहे, याची चर्चा जगभर सुरू झाली. खरंतर रविवारी लंडनमध्ये ‘नो ट्राऊझर्स डे’ साजरा झाला. या दिवशी लंडनच्या मेट्रो ट्रेनमध्ये पँट किंवा पायजमा घालायचा नाही. या मोहीमेत महिला-पुरुष सहभागी झाले. ते फक्त अंतवस्त्र घालून दिसत होते. वॉटरलू, वेस्टमिन्स्टर, साऊथ केन्स्टिंग्टन स्टेशनवर अशी गर्दी होती.
Comments are closed.