राज्यात दिवसाला सरासरी 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची धक्कादायक कबुली

राज्यात सरासरी दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात अशी धक्कादाय कबुली राज्य सरकारने दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

विधानपरिषदेत एका प्रश्नावर मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या 56 महिन्यात राज्यात दिवसाला ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सर्वाधिक आत्महत्या या मराठवाडा आणि विदर्भात झाल्या आहेत.

2024  मध्ये मराठवाड्यात 952, अकोल्यात 168, वर्ध्यात 112, बीडमध्ये 205 तर अमरावती विभागात 1069 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान संभाजीनगरमध्ये 952 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी 708 कुटुंबीयांना सरकारकडून मदत देण्यात आली. बीड जिल्ह्यात 167 प्रकरणात मदत जाहीर झाली तर 108 प्रकरणात मदत देण्यात आली आहे असे मंत्री मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.