पर्सनल लोन घेऊन खर्चाचे व्यवस्थापन करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा
खर्चांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे म्हणजे अनेकदा हुशारीने कर्ज केव्हा घ्यावे याबद्दल सजग असणे. तुम्ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला तोंड देत असाल, लग्नाचे नियोजन करायचे असेल किंवा मोठ्या खरेदीसाठी निधीची आवश्यकता असल्यास पर्सनल लोन हा तुमच्या बचतीचा वापर न करता पैसे मिळवण्याचा एक सोयीस्कर मार्ग असू शकतो. मात्र अर्ज करण्यापूर्वी, तुमच्या कर्जाचा जास्तीत जास्त वापर जबाबदारीने कसा करायचा हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्सनल लोन घेताना लक्षात ठेवण्याच्या पाच प्रमुख गोष्टी येथे दिल्या आहेत.
1. आपल्याला कर्ज का पाहिजे ते स्पष्ट करा
कर्ज घेण्याचे कारण शोधून सुरुवात करा. वैयक्तिक कर्ज लवचिक आहे – तुम्ही या रकमेचा उपयोग7 उच्च शिक्षण किंवा प्रवासासाठी निधी देण्यापासून ते वैद्यकीय देयके किंवा घर नूतनीकरणाच्या खर्चासाठी करू शकता.
उद्देश स्पष्ट असल्याने किती कर्ज घ्यावे आणि किती काळ त्याची परतफेड करावी हे ठरविण्यात मदत होते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लग्नासाठी किंवा तातडीच्या दुरुस्तीसाठी पैशांची गरज असल्यास, अल्पकालीन तत्काळ पर्सनल लोन सर्वोत्तम ठरू शकते. परंतु जर तुम्ही घराच्या नूतनीकरणासारखे दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवत असल्यास दीर्घ कालावधी तुमच्या अंदाजपत्रकाला अधिक अनुकूल असू शकतो.
2. व्याज दर आणि ऑफर यांची तुलना करा
सर्व पर्सनल लोन एकसमानपणे तयार केली जात नाहीत. वेगवेगळे कर्ज पुरवठादार वेगवेगळे व्याज दर आणि शुल्क देऊ करतात, त्यामुळे त्यांची तुलना केल्याने दीर्घकाळासाठी लक्षणीय रक्कम वाचविण्यात मदत होऊ शकते. बजाज फायनान्स संपूर्ण पारदर्शकतेसह स्पर्धात्मक दर देते – कोणतेही छुपे खर्च किंवा गुंतागुंतीच्या
अटी नाहीत. तुमचा संपर्क क्रमांक आणि ओटीपीची पडताळणी करून पूर्व-मंजूर कर्ज (प्री-अप्रूव्हड्लोन) ऑफर ऑनलाईन देखील तपासू शकता. एक साधी तुलनात्मक पायरी तुम्हाला योग्य कर्ज पुरवठादार निवडण्यात तसेच एकूण परतफेडीची रक्कम हजारो रुपयांनी कमी करण्यात मदत करू शकते.
3. तुमची पात्रता आणि क्रेडिट स्कोअर तपासा
तुमचा क्रेडिट स्कोअर हा कर्ज मंजुरी आणि मिळणारा व्याज दर निर्धारित करणाऱ्या सर्वात मोठ्या घटकांपैकी एक आहे. साधारणपणे, 685 किंवा त्याहून अधिक स्कोअर राखल्याने तुम्हाला चांगला सौदा म्हणजे डील मिळण्याची शक्यता वाढते.
अर्ज करण्यापूर्वी, बजाज फायनान्सच्या ऑनलाईन साधनांचा वापर करून पात्रता तपासा. तुमचे उत्पन्न, नोकरीची स्थिरता आणि परतफेड करण्याची क्षमता यावर आधारित किती कर्ज घेण्यास पात्र आहात हे तुम्ही पटकन शोधू शकता. तुमची पत/ क्रेडिट वापर कमी ठेवणे आणि वेळेवर परतावा रक्कम/व्याज भरल्याने तुमचा स्कोअर सुधारण्यास तसेच त्वरित वैयक्तिक लोन साठी मंजुरी मिळण्याची शक्यता वाढण्यास मदत होऊ शकते.
4. योग्य रिपेमेंट कालावधी निवडा
तुम्ही निवडलेला कार्यकाळ तुमचा मासिक ईएमआय आणि तुम्ही फेडत असलेले एकूण व्याज अशा दोन्ही घटकांवर परिणाम करतो. दीर्घ मुदतीमुळे तुमचा ईएमआय कमी होतो. परंतु एकूण व्याज वाढते; कमी मुदतीमुळे उलट होते.
बजाज फायनान्स लवचिक परतफेडीचे पर्याय देते. ज्यामुळे तुम्ही अंदाजपत्रक म्हणजे बजेटमध्ये सहज बसेल असा कार्यकाळ निवडू शकता. कर्जाची रक्कम, व्याज दर आणि मुदत यांचे वेगवेगळे संयोजन तुमच्या मासिक देयकांवर कसा परिणाम करतात हे पाहण्यासाठी तुम्ही ईएमआयकॅलक्युलेटरचा वापर करू शकता.
नियोजन करताना, बचत आणि आपत्कालीन खर्चांचा विचार करून ठेवा. तुमचे मासिक अंदाजपत्रक/बजेट खूप कमी न करता ईएमआय व्यवस्थापित करण्यायोग्य बनवणे हे उद्दिष्ट आहे.
5. नियम तसेच अटी काळजीपूर्वक वाचा
नियम आणि अटी गुळगुळीत छापलेले असतात, मात्र म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचे वाचन बारकाईने करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तुमचा कर्ज करार नेहमी तपशीलवार वाचा. व्याजदराच्या प्रकाराकडे (निश्चित किंवा अस्थायी) आगाऊ भरणा नियम, विलंबाने शुल्क भरणे आणि जप्ती शुल्काकडे लक्ष द्या.
बजाज फायनान्स कर्ज अटींमध्ये संपूर्ण स्पष्टता सुनिश्चित करते जेणेकरून तुम्ही नक्की कशासाठी नोंदणी करत आहात हे तुम्हाला कळेल. इन्सटंट पर्सनल लोनमुळे, किमान दस्तऐवजीकरण, त्वरित मंजुरी आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेचा फायदा होतो – ज्यामुळे तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा निधी मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
बोनस टीप: गरजेइतपत कर्ज घ्या
जरी तुम्ही अधिक रकमेसाठी पात्र असाल, तरी आवश्यक तेवढेच कर्ज घेणे शहाणपणाचे ठरेल. अधिक कर्ज म्हणजे जास्त ईएमआय आणि कालांतराने अधिक व्याज.
बजाज फायनान्सकडून रुपये 55 लाखांपर्यंतचे कर्ज घेणे शक्य आहे. अनावश्यक आर्थिक ताण न घेता लवचिकता मिळते. जबाबदारीने कर्ज घ्या – तुमच्या कर्जाची रक्कम वास्तविक गरज आणि परतफेड क्षमतेशी सुसंगत ठेवा.
शेवटचा मुख्य विचार
तुम्ही योग्य नियोजन केल्यास पर्सनल लोन हा आयुष्यातील खर्च व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात लवचिक आर्थिक उपायांपैकी एक आहे. बजाज फायनान्सबरोबर तुम्हाला संपूर्ण पारदर्शकतेसह निधी तसेच लवचिक कार्यकाळात त्वरित प्रवेश मिळतो. अर्ज करण्यापूर्वी, आर्थिक उद्दिष्टांचा आढावा घेण्यासाठी, प्रस्तावांची तुलना करण्यासाठी त्याचप्रमाणे परतफेडीचे नियोजन करण्यासाठी काही मिनिटे घ्या. विचारपूर्वक निर्णय घेतल्यावर, स्वत:च्या आर्थिक मनःशांतीशी तडजोड न करता खर्च व्यवस्थापित करण्यासाठी पर्सनल लोन हे एक शक्तिशाली साधन असू शकते.
*अटी आणि शर्ती लागू
अस्वीकरण: हा लेख सशुल्क वैशिष्ट्य आहे. ABP आणि/किंवा ABP LIVE येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन/सदस्यत्व घेत नाहीत. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि/किंवा त्या अनुच्छेदात नमूद केलेल्या/वैशिष्ट्यीकृत विचार, मते, घोषणा, घोषणा, पुष्टीकरण इत्यादींबाबत आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार आणि/किंवा कोणत्याही प्रकारे उत्तरदायी असणार नाही. त्यानुसार, दर्शकांच्या विवेकबुद्धीला कठोरपणे सल्ला दिला जातो.
आणखी वाचा
Comments are closed.