अमेरिकेच्या फक्त १० टक्के ताकदीपुढे इराण झुकले, मोजतबाही जखमी; पीट हेगसेथ यांचा दावा
अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने विजयाचा मोठा दावा केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले आहेत की, “ऑपरेशन एपिक फ्युरीत अमेरिकेला मोठे यश मिळाले असून इराणला युद्धविरामासाठी झुकावे लागले आहे.” वॉशिंग्टन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले आहेत.
#पाहा | वॉशिंग्टन, डीसी | युनायटेड स्टेट्सचे युद्ध सचिव, पीट हेगसेथ म्हणाले, “…इराणने या युद्धविरामासाठी भीक मागितली आणि आपल्या सर्वांना हे माहित आहे…ऑपरेशन एपिक फ्युरी हा रणांगणावरील ऐतिहासिक आणि जबरदस्त विजय होता…ऑपरेशन एपिक फ्युरीने इराणच्या सैन्याचा नाश केला आणि बरेच काही रोखले… pic.twitter.com/lMKfMAXxTW
— ANI_HindiNews (@AHindinews) 8 एप्रिल 2026
पीट हेगसेथ म्हणाले आहेत की, या संपूर्ण मोहिमेत अमेरिकेने आपल्या एकूण लष्करी ताकदीच्या १० टक्क्यांहून कमी वापर केला, तरीही इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री अमेरिकेने ८०० हून अधिक हवाई हल्ले केले, ज्यामध्ये इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या. इराणच्या अनेक फॅक्टरी जमीनदोस्त झाल्या असून त्यांचा मिसाइल प्रोग्राम आता पूर्णपणे ठप्प झाला आहे.
याच कारवाईत इराणची ८० टक्के एअर डिफेन्स सिस्टिम आणि ९० टक्के शस्त्रास्त्रांच्या फॅक्टरी नष्ट झाल्याचा दावा अमेरिकन लष्करी अधिकारी केन (CAINE) यांनी केला आहे. या हल्ल्यांमुळे इराणला आपली लष्करी ताकद, विशेषतः नौदलाची क्षमता पुन्हा उभी करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. तसेच इराणचे नवीन सर्वोच्च नेते गंभीर जखमी झाल्याचा दावाही पेंटागनने केला आहे.
Comments are closed.