… तर शेवट चांगला होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा हिंदुस्थानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो हे सातत्याने हिंदुस्थानला डिवचत आहेत. एकीकडे ट्रम्प हिंदुस्थान खास असल्याचे म्हणत असताना दुसरीकडे नवारो रोज आक्रमक विधानं करत आहेत. आताही त्यांनी हिंदुस्थानला गंभीर इशारा दिला आहे. हिंदुस्थानला अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत लवकरात लवकर निष्कर्ष काढावा लागेल, अन्यथा शेवट चांगला होणार नाही, असा इशारा नवारो यांनी दिला.
हिंदुस्थान अमेरिकन वस्तुंवर महाराजा टॅरिफ लादून आम्हाला डिवचत आहे. हिंदुस्थानने जगातील इतर कोणत्याही देक्षापेक्षा जास्त टॅरिफ लादल्याचे खरे आहे, असे नवारो एका मुलाखतीत म्हणाले. तसेच रशिया-युक्रेन युद्धापूर्वी हिंदुस्थानने खूप कमी प्रमाणात रशियाकडून तेल आयात केले होते. पण आता स्वस्त रशियन कच्च्या तेलाच्या माध्यमातून प्रचंड फायदा मिळवत आहे. हिंदुस्थानकडून मिळालेल्या या पैशांचा वापर रशिया शस्त्रास्त्र खरेदीसाठी करत आहे आणि युक्रेनचे लोक मरत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
अमेरिकेला मोठा धक्का! जगभरातील मध्यवर्ती बँकांची सोन्याची जबरदस्त खरेदी, डॉलर घसरण्याची शक्यता
हिंदुस्थानने लादलेल्या महाराजा टॅरिफमुळे अमेरिकेत नोकऱ्या जात आहेत. हिंदुस्थान रशियाकडून प्रचंड तेल खरेदी करत असून यातून मिळणारा पैसा रशिया युद्ध सामुग्रीसाठी वापरत आहे. यामुळे लोक मरत आहेत आणि अमेरिकन करदात्यांना या संघर्षासाठी जास्त कर भरावा लागत आहे, असे म्हणत हिंदुस्थान हे सत्य नाकारू शकत नाही, असेही नवारो म्हणाले. तसेच हिंदुस्थानचे रशियासोबत ऊर्जा क्षेत्रात वाढणाऱ्या संबंधांचा शेवट चांगला होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ट्रम्प यांच्या डिनर पार्टीतच हाणामारी; अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि उच्च वित्त अधिकाऱ्यांमध्ये जुंपली
Comments are closed.