आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याविरुद्ध आणखी एक याचिका सुनावणीस सहमती दर्शविली आहे. ही नवीन याचिका माजी प्राध्यापक हिरेन गोहेन, आसामचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) हरेकृष्ण डेका, ज्येष्ठ पत्रकार परेश चंद्र मालाकर आणि ज्येष्ठ वकील शंतनू बोरठाकूर यांनी दाखल केली आहे. या याचिकेत एका समुदायाच्या सदस्यांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला आहे. सदर याचिकेत चार व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देण्यात आला असून त्यात मुख्यमंत्री रायफलद्वारे एका समुदायावर गोळीबार करताना दिसत आहेत. बुधवारी न्यायालयाला त्याच प्रकरणासह नवीन याचिका सूचीबद्ध करण्यास सांगितले गेले. त्यानुसार सरन्यायाधीशांनी सुनावणीची तयारी दर्शवली आहे.

Comments are closed.