अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती
पेट्रोल डिझेल बातम्या: इराण इस्त्रायल अमेरिका युद्धाचा सर्वच देशावर परिणाम होताना दिसत आहे. भारत देशात सुद्धा गॅसचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या देखील चर्चा सुरु आहेत. याबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून सर्व रिफायनरी 100 टक्के क्षमतेने कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याने, त्यांनी जनतेला घाबरून खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, सर्वसामान्य इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा नाही
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा नसल्याची माहिती सरकारने म्हटले आहे. अफवांकडे लक्ष देऊ नका.
देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा पुरवठा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. किमती स्थिर आहेत, रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत आणि लोकांना घाबरून खरेदी करणे व अफवा पसरवणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठाही पूर्ण
सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, घरगुती पीएनजी आणि वाहतुकीसाठीच्या सीएनजीचा पुरवठाही पूर्णपणे सामान्य आहे. आतापर्यंत, अंदाजे 2.20 लाख ग्राहकांनी एलपीजीवरून पीएनजीकडे आपला कल वळवला आहे, तर अंदाजे 2.5 लाख अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. गॅस पुरवठ्यावरील ताण कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
एलपीजी वितरण सुरु, बुकिंगमध्ये वाढ
घरगुती एलपीजी वितरण सामान्य आहे, मात्र बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. ही घाबरण्याची परिस्थिती नाही आणि सर्व ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध करून दिला जात आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, ढाबे, कॅन्टीन आणि रेस्टॉरंटना 26 टन व्यावसायिक गॅसचा पुरवठा करण्यात आला आहे.
काळाबाजारावर कारवाई
सरकारने काळाबाजारावरही कठोर कारवाई केली आहे. छाप्यांमध्ये जवळपास 2000 सिलिंडर जप्त करण्यात आले. सर्व राज्यांना रॉकेलचे वाटप करण्यात आले असून, 16 राज्यांसाठी वाटप आदेश जारी करण्यात आले आहेत.
शिपिंग आणि बंदरांचे कामकाज सामान्य
शिपिंग मंत्रालयाच्या माहितीनुसार, आखाती प्रदेशात 20 जहाजे आणि 540 भारतीय खलाशी आहेत, जे सर्व सुरक्षित आहेत. आतापर्यंत 50 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. बंदरांवरील परिस्थितीही सामान्य आहे. मुंद्रा बंदराने 15 दिवसांसाठी मोफत साठवणूक आणि वाहतूक शुल्क माफ करणे यासारखी पावले उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी रणधीर यांनी सांगितले की, जागतिक नेत्यांशी सतत संवाद सुरू आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या शांततेवर व सुरक्षेवर भर दिला. श्रीलंका आणि इराणसोबतही चर्चा सुरू आहे.
भारतीयांच्या सुरक्षेवर लक्ष
आखाती प्रदेशाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी सांगितले की, सरकार भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.