मुख्यमंत्र्यांनी हातावरच्या नोटवर न जाता तिच्या पत्राची दखल घ्यावी, डॉ. धुमाळांना सर्व माहिती ह
फलटण गुन्हा डॉक्टर मृत्यू: सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Crime Doctor Death) केल्याची घटना घडली. मृत महिला डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (Gopal Badne) याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर (Prashant Bankar) नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिला. आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांकडे तक्रार केली असता त्यांनी दखल घेतली नाही, असे म्हटले आहे. तसेच एक खासदार आणि त्यांच्या पीएचा देखील उल्लेख यात करण्यात आला आहे. आता मृत महिला डॉक्टरच्या बहिणीने खळबळजनक आरोप केलाय. 80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं, असे त्यांनी म्हटले आहे.
पीडित डॉक्टर मुलीची चुलत बहीण म्हणाल्या की, मागील महिन्यात माझं तिच्याशी बोलणं झालं. पोस्टमार्टमसाठी मला दबाव येत आहे. अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठी दबाव होता. याला नकार दिल्यामुळे त्रास वाढत गेला. पाच पानाचं आम्ही पत्र दिले. त्याची चौकशी झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तिने माहितीचा अधिकार देखील दिला होता, असे त्यांनी म्हटले.
Phaltan Crime Doctor Death: 80 ते 90 पोस्टमार्टम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का?
त्या पुढे म्हणाल्या की, एवढं करून काहीच न झाल्याने आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. 80 ते 90 पोस्टमार्टम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? ती असे करूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, केवळ हातावरच्या नोटवर न जाता या पत्राकडे पहावं. धुमाळ यांना सर्व माहिती होते. आमच्या घरातील कर्ती मुलगी गेली आहे. तिचे आई-वडील शेती करतात. तिच्या शिक्षणाचे कर्ज देखील फिटले नव्हते. हे फार दुःखाची गोष्ट आहे. भावाचे उच्च शिक्षण झाले आहे. आमची मुलगी तुम्ही आणून देऊ शकत नाही. मात्र तिच्या आई-वडिलांना आधार देण्यासाठी तिच्या छोट्या भावाला नोकरीला लावून घ्यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.