फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मोबाईलमधील पुराव्यांबाबत महत्त्वाची अपडेट, ‘त्या’ डायरीबाबत पोलिसांचा ख


सातारा: फलटण येथील डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Case) प्रकरणी मयत डॉक्टरचे मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झालेले नाहीत. याबरोबरच कोणतीही डॉक्टरची वैयक्तिक डायरी मिळालेली नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली आहे. फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टर यांचे व्हाट्सअप चॅट (Phaltan Doctor Case) डिलीट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी (Phaltan Doctor Case) केला होता याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मिळालेले सर्व डिजिटल पुराव्याची सायबर टीममार्फत तपासणी सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये याबरोबरच डॉक्टर महिलेची वैयक्तिक माहिती असणारी किंवा तक्रारी दिलेली अशी कोणतीही डायरी सापडलेली नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिले आहे. (Phaltan Doctor Case)

Phaltan Doctor Case: पीडित व्यक्तीच्या ऑफिसची सर्च ही योग्य पंचांसमोर

पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, माझं फक्त नागरिकांना एकच सांगणं आहे कोणत्याही परिस्थितीत आपण अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचा तपास सुरू आहे. मृत डॉक्टरच्या मोबाईल मधील कोणतेही पुरावे डिलीट न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्यांची तपासणी करून घेत आहोत, मोबाईलबाबत चाललेल्या बातम्या आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये. मी पुन्हा एकदा सांगतो की पीडित व्यक्तीच्या ऑफिसची सर्च ही योग्य पंचांसमोर घेण्यात आलेले आहे. तेथील ज्या सर्व गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. त्या तपासामध्ये अशी कोणती वैयक्तिक डायरी पुढे आलेली नाही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, आमच्या प्रक्रियेनुसार तिथे ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्याची तपासणी करून पुरावे घेणे चालू आहे यामध्ये कोणतीही वैयक्तिक डायरी किंवा नोंदी किंवा कोणतीही दैनंदिनी अशी कोणती गोष्ट मिळालेली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली आहे.

Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद

फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे .

Phaltan Doctor Case: पीडित डॉक्टरच्या वडिलांची प्रतिक्रिया…

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते . राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते. ‘तुम्हाला आता काय हवंय ? ‘ असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी ‘SIT चौकशी आणि आरोपींना फाशी ‘ या दोन्ही गोष्टीची मागणी केली… यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केलाय.

आणखी वाचा

Comments are closed.