‘ती’ 23 तारखेची रात्र; रूम नंबर 114 अन् 17 तासांचे रहस्य! डॉक्टर तरूणीच्या प्रकरणातील हॉटेल रू


फलटण : फलटणमध्ये डॉक्टर तरूणीने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या (Phaltan Doctor Case) केली ‘त्या’ रात्रीचा घटनाक्रम हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी माध्यमांपुढे काल (बुधवारी ता 29) सांगितला. (Phaltan Doctor Case)

Phaltan Doctor Case: बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या…

२३ तारखेच्या मध्यरात्री १ वाजून २३ मिनिटांनी एका दुचाकीवरून एकटी डॉक्टर तरूणी हॉटेलच्या गेटवर आली. ‘मी बारामतीला चालली आहे; पण रस्ता लांब आहे. मी एकटीच आहे, मला फक्त एक रात्र राहू द्या.’ या तिच्या विनंतीनंतर वॉचमनने हॉटेलचे गेट उघडले. केवळ तीन मिनिटांत ती स्वागत कक्षात पोहोचली. तिने स्वतःचं रजिस्टरमध्ये नाव नोंदवले, आधार कार्ड दिले आणि ‘पेमेंट सकाळी करते’ असे सांगून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी रूम नंबर ११४ मध्ये गेली.

सतरा तासांची ‘ती’ गूढ शांतता..सकाळी ११ वाजले तरी रूम नंबर ११४चे दार उघडले नव्हते. त्यामुळे मॅनेजरने औपचारिकता म्हणून दार वाजवले होते; मात्र तिथून प्रतिसाद आला नाही. सायंकाळी चार वाजता पुन्हा दार वाजवले; त्यावेळी देखील प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांना बोलावून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी डुप्लिकेट चावीने दार उघडले. यावेळी व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले होते. आतमध्ये महिला डॉक्टर पंख्याला लटकलेली दिसली.

Phaltan Doctor Case: ही आत्महत्याच, बदनाम करण्यासाठी षडयंत्र

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माझा व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर एकत्रित फोटो दाखवला. हा फोटो भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमातील आहे. रणजितसिंह यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी हे सर्व षडयंत्र रचलं आहे. हत्या हा राजकीय शब्द असून, आत्महत्या ही वस्तुस्थिती आहे, असे हॉटेलचे मालक दिलीपसिंह भोसले यांनी परिषदेत केला.

Phaltan Doctor Case: ‘डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आली तेव्हा फ्रस्ट्रेट होती’

हॉटेल मधुदीपचे मालक भोसले यांनी सांगितले की, डॉक्टर तरुणी रात्री हॉटेलमध्ये आली तेव्हा थोडीशी फ्रस्ट्रेशनमध्ये दिसत होती, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तिचा चेहरा थोडासा पडलेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसेल की, दार उघडताना तरुणी फ्रस्ट्रेट दिसत होती. त्यांच्या देहबोलीतून ही गोष्ट स्पष्टपणे समजून येत होती, असे भोसले यांनी म्हटले. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मला काही बोलायचे नाही. आमच्यावर आणि आमच्या नेत्यावर जी काही चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला, तो चुकीचा होता. फलटणमध्ये कुठेतही विकास होतोय, फलटणची एका नव्या दिशेने वाटचाल सुरु आहे, हे विरोधकांना खपत नसावे, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण केले जात आहे, असा आरोप हॉटेल मालक भोसले यांनी केला.

Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद

फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

Phaltan Doctor Case: पीडित डॉक्टरच्या वडिलांची प्रतिक्रिया…

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते . राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते. ‘तुम्हाला आता काय हवंय ? ‘ असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी ‘SIT चौकशी आणि आरोपींना फाशी ‘ या दोन्ही गोष्टीची मागणी केली… यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केलाय.

आणखी वाचा

Comments are closed.