फलटण अत्याचार प्रकरणातील गोपाल बदनेचा नवा कारनामा सोशल मीडियावर व्हायरल; व्हिडीओमध्ये नेमकं काय
फलटण डॉक्टर क्राईम न्यूज : साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यातील अत्याचार प्रकरणातील (Phaltan Doctor Crime News) संशयित आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (Gopal Badane) याचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Gopal Badane Viral Video) होत आहे. वर्दीवर नसलेला हा पीएसआय गोपाल बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. एका वाहनचालकाने त्यावेळी त्याचा मोबाईल काढून या घटनेचं चित्रीकरण केलं आणि तोच व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
दरम्यान, गोपाल बदने (Gopal Badane) सध्या फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे या व्हिडीओनं पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आणली आहे. सध्या हा व्हिडीओ कधीचा आहे, आणि तो अधिकृत चौकशीसाठी वापरला जाणार का?, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
गोपाल बदने आणि प्रशांत बनकरसोबत डॉक्टर महिलेची चॅटिंग- (Phaltan Doctor Crime News)
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात डॉक्टर महिला ही दोन्ही संशयित आरोपी यांच्याशी संपर्कात होती. संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत डॉक्टर महिलेचे बोलणे आणि चॅटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे, मात्र फायनल शवविच्छेदन अहवाल प्राप्त व्हायचं आहे असं देखील पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे. मयत डॉक्टर या ज्यावेळेस हॉटेलमध्ये गेली, त्यावेळेस ती एकटी होती. हे सीसीटीव्हीमध्ये दिसत असून हॉटेलमधील डीव्हीआर हा आम्ही जप्त केला आहे. डीव्हीआर तपासल्यास तर कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला आढळून आली नाही. तरीसुद्धा ती हॉटेलवर का गेली या गोष्टींचा पूर्ण तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपणार- (Gopal Badane Arrested)
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे. फलटण न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत बनकरला पोलिस कोठडी सुनावली होती. आज फलटण पोलिस प्रशांत बनकर ला पुन्हा न्यायालयात हजर करतील.मात्र फलटण पोलिस पुन्हा प्रशांत बनकर ची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार का? हे पाहावे लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय? (Phaltan Doctor Crime News)
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केलीय. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस निरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती समोर येतेय. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती असं समजतंय. मात्र डॉक्टरच्या मृतदेहाच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळलीय. त्यात त्यांनी पोलिसानेच बलात्कार झाल्याचं नमूद करत आत्महत्या केल्याचं म्हटलंय.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.