डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाचे गंभीर आरोप; डॉ. धुमाळ टॉर्चर करायचे, फलटणच्या राजकारण्याचा उल्लेख, आ
सातारा: सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Phaltan Doctor Death Case) केली. ही घटना गुरुवारी (ता, २३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले (Phaltan Doctor Death Case) आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले असून, दोघांचा शोध घेतला जात होता. पहाटेच्या सुमारास प्रशांत बनकरला (Phaltan Doctor Death Case) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करून काही होणार नाही; त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयत डॉक्टर तरूणीच्या कुटूंबाची आहे.(Phaltan Doctor Death Case)
Phaltan Doctor Death Case: फलटणच्या राजकारणी लोकांचा तिच्यावर दबाव
प्रशांत बनकर या आरोपीला अटक झाली मात्र अटक करून काही होणार नाही. दुसरा आरोपी बदने याला अटक करून चार्जशीट फाईल करावे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल. आत्महत्या केल्याचं समजतात मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि हातावरील सुसाईड नोट पाहिली. त्यानंतर फॉरेन्सिक एक्सपर्टची आम्ही मागणी केली. आमची जेमतेम परिस्थिती परंतु सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही तिला मेडिकल ऑफिसर बनवले. फलटणच्या राजकारणी लोकांचा तिच्यावर दबाव होता. पोस्टमार्टम (पीएम) रिपोर्ट बनविण्यासाठी तिच्यावर दबाव होता. याबाबत तिने खुलासा केला तक्रारी दिल्या. मात्र त्याच निरासन झालं नाही, असंही मृत डॉक्टरच्या घरातील व्यक्तींनी म्हटलं आहे.
Phaltan Doctor Death Case: धुमाळ नावाचा वैद्यकीय अधिकारी तिला वारंवार टॉर्चर करायचा
धुमाळ नावाचा वैद्यकीय अधिकारी तिला वारंवार टॉर्चर करत होता. त्याला वरून प्रेशर यायचं तो तिला प्रेशर द्यायचा. सुट्टी देखील देत नव्हता. त्याने आम्हाला सहकार्य केलं नाही. पोलिसांना देखील सहकार्य केलं नाही. यातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी लेकराला न्याय मिळाला पाहिजे. खासदारांच्या पीए कढून देखील तिच्यावर दबाव होता. खासदारांचे दोन पीए आहेत, मात्र ते कोण माहीत नाही. यात केवळ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे, ऑफीसर असलेल्या मुलीचं असं होतं असेल तर इतर मुलींनी कसं काय करावं असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: गळफास घेण्यापूर्वी तळहातावर लिहिले आत्महत्येचे कारण
गळफास घेण्यापूर्वी तळहातावर डॉक्टर तरूणीने आत्महत्येचे कारण लिहिले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आणि सखोल तपास केला जाईल, असे सांगितले आहे. हातावरील मजकूर हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गोपाळ बदने निलंबित
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली असून, संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावे, असे आदेश पोलिसांना दिले. त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला तत्काळ निलंबित केले आहे. तो फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.