फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
सातारा : फलटणच्या डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांच्या कोर्टाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, आरोपीचे वकील ॲड. राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तिवाद करत आरोपी बदने याला 1 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला मात्र कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
Gopal Badane Sent to Police Custody : गोपाल बदनेला पोलीस कोठडी
सरकारी वकील ॲड. सुचिता वायकर-बाबर यांनी याला आक्षेप घेत मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते, असा दाखला देत आरोपीच्या मेडिकल टेस्ट, मोबाईल, वाहन तसेच घटनास्थळाचा तपास करायचा असून आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.
सरकारी वकिलांकडून हा गुन्हा अत्यंत गंभीर असून महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारा आहे.मोबाईल जप्त करण्यासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सुसाईड नोट मध्ये असलेल्या बलात्काराचा उल्लेख तपासायचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेची दोघांनाच माहिती, त्यातील एक मयत असल्याने गुन्हा करण्याची ठिकाणं , पद्धत या सगळ्यांचा तपास करायचाय, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना एफआयआरमधल्या नोंदी विरोधाभासी आहेत, असं मांडलं गेलं. दोन गुन्हे असताना एकच एफआयआर करण्यात आलाय. सुसाईड नोट मध्ये अत्याचाराचा आणि छळवणूक केल्याचा उल्लेख प्रशांत बनकरच्या संबंधाने आहे. चार महिने त्यांच्यात लग्न करण्यावरून विवाद सुरू होते.
पीडfत महिला आरोपी क्रमांक एकच्या घरी राहत होती. आत्महत्या करायला ती हॅाटेल मध्ये का आली? तिला बाहेर जायला प्रवृत्त करण्यात आलं होतं का? हा प्रश्न अनुत्तरित आहे ..आरोपी दोनला बळीचा बकरी बनवण्यात आलाय, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
संबंधित डॅाक्टरकडे पोलिसांनी अटक आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेल्यावर माझ्या ड्युटी मध्ये आरोपी का आणता यावरून वाद झाले होते. 25 जून रोजी परस्परांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या.त्यावेळी बलात्काराची तक्रार करण्यात आलेली नाही.
आरोपी एक मुळे आत्महत्येला प्रवृत्त झाल्याचं सुसाईड नोट मध्ये लक्षात येतय.पण जाता जाता आरोपी दोन ला अडकवायचा प्रयत्न म्हणून त्याचं नाव टाकण्यात आलंय. संबंधित पीडितेला बलात्कार झाला असेल तर त्याची वेळ ठिकाण सगळं नोंदवतां आलं असतं पण सुसाईड नोट मधला आरोप वेग आहे, सुसाईड नोटची सत्यताच क्वेशनेबल आहे त्यामुळे मोबाईल जप्त करणे गाडी साठी एक दिवस पुरेसा आहे, असा युक्तिवाद आरोपी गोपाल बदनेच्या वकिलांनी केला.
सरकारी वकिलांनी लॅटिन ट्रमिनॅालॅाजी सांगत सुसाईड नोट ही डायिंग डिक्लेरेशन असल्याने सत्य समजल्या जाण्याबाबत अनेक आदेश यापूर्वी झालेत. त्यामुळे त्यावर शंका घेणं हा आरोपीच्या वकीलांचा मुद्दा चुकीचा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. यावर आरोपीच्या वकिलांनी इंग्रजीमध्ये डायिंग डिक्लेरेशनचा कायदेशीर अर्थ समजावून सांगत एक दिवसाची पोलिस कोठडी द्यावी, सहकार्य करायला तयार आहोत, असं म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.