IPL 2025: आरसीबीचे 11.50 कोटी पाण्यात? या स्टार खेळाडूचा खराब फाॅर्म कायम

सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) सुरू आहे. पण या मेगा स्पर्धेत काही प्रमुख खेळाडू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. यामध्ये इंग्लंडचा स्टार फलंदाज ‘फिल साल्ट’चेही (Phil Salt) नाव आहे. स्पर्धेत खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये साल्टला एकदाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सॉल्टचा हा फॉर्म पाहून राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ व्यवस्थापन आणि चाहते खूप चिंतेत पडले आहेत.

फिल साल्ट (Phil Salt) आयपीएल 2025मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे, जो आयपीएल 2024 मध्ये गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा भाग होता. आरसीबीने आयपीएल 2025च्या मेगा लिलावात फिल साल्टला 11.50 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या ताफ्यात सामील केले होते.

आरसीबीने मागील हंगामातील कामगिरी त्याची लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. पण गेल्या काही काळापासून फिल साल्ट ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे ते पाहता असे दिसते की आरसीबीने साल्टला खरेदी करून आपले पैसे पाण्यात घालवले आहेत.

साल्टने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळलेल्या शेवटच्या 12 डावांमध्ये फक्त एकदाच 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. इतर प्रसंगी, त्याने त्याच्या खराब कामगिरीने सर्वांना निराश केले आहे. यामुळे, साल्टला चाहत्यांकडूनही लक्ष्य केले जात आहे.

आयपीएलमध्ये साल्टची खराब कामगिरी अशीच सुरू राहिली तर आरसीबीसाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. फ्रँचायझीने साल्टला एक रणनीती लक्षात घेऊन खरेदी केले आहे आणि जर त्याने चांगली कामगिरी केली नाही तर संघाची कामगिरी बिघडू शकते.

यंदाचा आयपीएल हंगाम (21 मार्च) पासून सुरू होणार आहे. दरम्यान शुभारंभ सामन्यात गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होईल. दोन्ही संघ ईडन गार्डन्स मैदानावर आमने-सामने असतील. तत्पूर्वी आरसीबीने आयपीएल 2025 साठी रजत पाटीदारला (Rajat Patidar) कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

बीसीसीआयकडून दरमहा पैसे घेण्यामागे काय आहे सचिन आणि धोनी यांचे गुपित?
चार्टर्ड अकाउंटंट असून क्रिकेटमध्ये जीव., गोलंदाजासाठी श्रेयस अय्यरने केली खास कृती!
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात्कृष्ट कोण? सचिन की विराट? माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर

Comments are closed.