Photo – प्रदूषित हवेने मुंबईकरांची चिंता वाढवली

गेल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरांत थंडीची तीव्रता वाढली. सलग चार दिवस तापमान 16-17 अंशांच्या आसपास राहिले. त्यामुळे सुखद गारवा अनुभवणाऱ्या मुंबईकरांना रविवारी मात्र हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेने चिंतेत टाकले.
(छायाचित्र : संदीप पगडे)

सकाळी शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला.

हा निर्देशांक हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत दर्शवत आहे.

याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भिती असल्याने सर्वांनी प्रदूषित हवेत जाणे टाळावे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून दिला जात आहे.

या प्रदूषित हवेने सर्व वयोगटांतील मुंबईकरांची चिंता वाढवली आहे.

Comments are closed.