Photo – साईचरणी 59 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण
शिर्डीतील श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.

शनिवारी (14, फेब्रुवारी) रोजी कोठारबन जि. बीड, महाराष्ट्र येथील साईभक्त धनराज रावसाहेब मुंडे यांनी श्री साईचरणी 59 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला.

धनराज रावसाहेब मुंडे यांनी हा हार श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा. प्र. से.) यांच्याकडे सुपुर्द केला.

बाजारामध्ये या सुवर्ण हाराची किंमत 8 लाख 42 हजार 520 रुपये आहे.

हा सुंदर नक्षिकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
Comments are closed.