Photo – हार्दिक-दुबेचा तडाखा अन् गोलंदाजांचा भेदक मारा, टीम इंडियाने इंग्लंडला नमवत सामन्यासह मालिकाही जिंकली
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना पुण्यामध्ये पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने सामना जिंकत मालिका सुद्धा 4-1 अशा फरकाने खिशात घातली आहे.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. परंतु टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला संजू सॅमसन अवघ्या 1 या धावसंख्येवर माघारी परतला. अभिषेक शर्मा ताबडतोब फलंदाजी करण्याच्या नादात 29 या धावसंख्येवर बाद झाला.
त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांना भोपळाही फोडता आला नाही. मात्र रिंकु सिंग (26 चेंडू 30 धावा), शिवम दुबे (34 चेंडू 53 धावा) आणि हार्दिक पंड्या (30 चेंडू 53 धावा) यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाने दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडची मधळी फळी फोडून काढली. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ 166 या धावसंख्येवर तंबुत परतला.
इंग्लंडकडून फिल सॉल्ट (23 धावा), बेन डकेट (39 धावा) आणि हॅरी ब्रुक (51 धावा) यांनी चांगली फलंदाजी केली.
टीम इंडियाकडून हर्षित राणा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तसेच वरुन चक्रवर्ती याने 2 आणि अर्शदिप सिंग व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला.
Comments are closed.