Photo – जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीची निर्धार परिषद

जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या निर्धार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. “ज्या भाजपचं देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नाही, ती इथली व्यवस्था बिघडवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे.” असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.