Photo – ‘जय भवानी, जय शिवाजी’… जयघोषाने फोर्ट परिसर दुमदुमला, शिवराय संचलन मोठ्या उत्साहात पार पडले
हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी फोर्ट परिसरात नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. हॉर्निमन सर्कल ते हिंदुस्थानच्या प्रवेशद्वारापर्यंतचा (गेटवे ऑफ इंडिया) परिसर भगवामय झाला होता. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आयोजित भव्यदिव्य असे शिवराय संचलन मोठ्या उत्साहात पार पडले.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते.

फोर्टच्या हॉर्निमन सर्कल येथील रिझर्व्ह बँकेच्या अमर बिल्डिंग ते हिंदुस्थानचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) असे हे संचलन पार पडले.

त्यानंतर गेटवेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन संचलनाची सांगता करण्यात आली.

लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे व सरचिटणीस प्रदीप मयेकर, मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागप्रमुख, महिला विभाग संघटक आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

संचलनादरम्यान हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
Comments are closed.