Photo – दक्षिण कोकणची काशी! श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिंधुदुर्ग जिल्ह्याती देवगड येथील दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रात्री १२ वाजले पासून मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपातील दर्शन रांगांमधून भाविक भक्तगण दर्शनासाठी रांगेत उभे होते.

श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्यासह महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, यांच्या सर्वांच्या सहकार्याने १५ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यानंतर देवस्थानचे पुजारी, गुरव, ग्रामोपाध्ये तसेच मानकरी देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची विधिवत पूजन करण्यात आली.

प्रशासकीय पूजेचा मान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर तहसीलदार रमेश पवार अन्य मान्यवर यांना देण्यात आला.

भाविकांना रात्री २.३० वाजता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. आकर्षक सुयोग्य दर्शन रांगांमधून भाविकांना दर्शन देण्यात येत आहे.

या यात्रा उत्सवात श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे व्यासपीठ प्रामुख्याने महसूल प्रशासन कक्ष, पंचायत समिती मार्गदर्शन कक्ष, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय, विधी सेवा समिती कक्ष यांचा सहभाग असून कायदा सुव्यवस्था राखण्याण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नियंत्रण कक्ष देवस्थान परिसरात कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्यात आला आहे.

माजी आमदार वैभव नाईक कणकवली, नगरसेवक सुशांत नाईक यांनी श्री देव कुणकेश्वर दर्शन घेऊन भाविक भक्तगणांना शुभेच्छ दिल्या.

Comments are closed.