Photo – महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या पुणे महानगरपालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणूकीतील विजयी उमेदवारांचे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.


यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार बाबाजी काळे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या सर्व विजयी नगरसेवकांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले.

यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, आमदार राहुल पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed.