Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!

‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी नगरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या 15 लाखांवर वारकरी भाविकांनी फुलून गेली आहे. आपल्या विठू रायाच्या दर्शनासाठी भाविक आठ आठ तास रांगेत उभे आहेत. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली.

Comments are closed.