धक्कादायक घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं, 11 जणांनी केली प्रियकराची हत्या, नऊ जणांना अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे नात्यातील एका मुलीच्या 26 वर्षीय प्रियकराला 11 जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 22 जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मृत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. दोघेही लग्नावर ठाम असल्याने, तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या घरी गेला. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोन आरोपी फरार

दरम्यान, या घटनेची माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर, त्यांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी तरुणीचे वडील प्रशांत सारसर, करण खोकरसह एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरार 2 आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी पोलिस सर्व चौकशी करत आहेत.

दरम्यान, मिळालेल्यामाहितीनुसार दोघांच्या लग्नाला मुलीच्या घरच्यांनी विरोध केला होता. मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. मात्र, दोघेही लग्नालाठाम होते. त्यामुळं मुलीच्या घरच्यांनी लग्नाच्या संदर्भातील बोलणी करण्यासाठी मुलाच्या कुटुंबियांना घरी बोलावले होते. त्यानंतर रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोबत मुलीच्या घरी गेला होता. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. यावेळी रामेश्वरला जहर मारहाण करण्यात आली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?

आणखी वाचा

Comments are closed.