पिंपरीत भलतंच घडलंय, एकाचं जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी; दोन ठिकाणचा ‘हा’ पेच कसा सुटणार?
Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election 2026: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election 2026) भलतंच घडलंय. एकाचं जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी मिळालेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 20 ‘ब’ आणि 30 ‘अ’ जागेवर हा पेच निर्माण झालाय. नीलम म्हात्रे यांना प्रभाग 20 मधील ब जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले तसेच संदीप गायकवाड यांना प्रभाग 30 मधील ‘अ’ जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेनं ही एबी फॉर्म घेतले. आता या दोघांनी एकाचं पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र या दोघांनी दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म दाखल केले आणि छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरलेत. त्यावेळी या दोघांकडे एका पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्याची वेळ होती. मात्र या दोघांनी ती प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळं या दोघांकडे अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत (2 जानेवारी, दुपारी 3 पर्यंत) एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा पर्याय असेल. जर त्यांनी तसं केलं नाही तर शेवटी याचा निकाल निवडणूक आयोग लावेल. 2 जानेवारीच्या दुपारी तीननंतर निवडणूक आयोग या दोघांनी सर्वात आधी ज्या पक्षासाठी अर्ज आणि एबी फॉर्म दाखल केला, त्या पक्षाची उमेदवारी गृहीत धरेल. मग त्यावेळी या दोघांकडे कोणता पर्याय शिल्लक नसेल. त्यामुळं अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपूर्वी या दोघांना एकाचं पक्षाची निवड करण्याची संधी मिळणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचीसुध्दा गोची, 128 पैकी 125चं उमेदवार रिंगणात- (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election 2026)
पिंपरी चिंचवडमधील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झालंय. भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीत इथं थेट लढत पहायला मिळत आहे. तर इतर पक्षांना निम्मे ही उमेदवार रिंगणात उतरवता आलेले नाहीत. इथं भाजप स्वबळावर लढतंय. पण शिंदे गटाची कोंडी करण्याच्या नादात त्यांच्या तीन उमेदवारांचे एबी फॉर्म उशिरा जमा झाले, हे एबी फॉर्म छाननीमध्ये बाद झालेत. त्यामुळं भाजपची सुद्धा गोची झालीये, 128 पैकी त्यांचे 125 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी रवी लांडगे हे बिनविरोध झाल्यानं भाजपने खातं उघडलंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 121 उमेदवार निवडणूक लढतील. शरद पवार राष्ट्रवादी एका प्रभागात तुतारी चिन्हावर लढणार आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी 8 जागांवर मैत्रीपूर्ण लढतायेत. हे पाहता शरद पवारांची राष्ट्रवादी एकूण 12 जागेवर तुतारी चिन्हावर लढत आहे.
पक्ष निहाय उमेदवारांची संख्या
– एकूण 128 जागांसाठी लढत
भाजप – 125 ( पैकी आरपीआय आठवले गटाचे 5 उमेदवार कमळ चिन्हावर लढतायेत )
दोन्ही राष्ट्रवादी आघाडी
– अजित पवार गट – 121
– शरद पवार गट* – 12
शिंदे शिवसेना – 65
ठाकरे सेना – मनसे युती
– ठाकरे सेना – 54
– मनसे – 16
– रासप – 2
काँग्रेस – 50
बिनविरोध
भाजपचे रवी लांडगे प्रभाग 6 ‘ब’ मधून बिनविरोध नगरसेवक झालेत.
अर्ज केल्यानंतर
अजित पवार राष्ट्रवादीचा प्रभाग 6 मधील ‘ब’ जागेचा अर्ज बाद
ab form baad
भाजप – 3 ( प्रभाग 24 ब, क, ड )
शिंदे सेना – २ (विभाग २४ ब, २४ अ)
अजित पवार गट – 1 ( प्रभाग 16 ब )
मैत्रीपूर्ण लढती
– दोन्ही राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण
प्रभाग क्रमांक-18A, 9A, 9B, 9K, 9D, 20A, 20B, 30A
– ठाकरे सेना – मनसेत मैत्रीपूर्ण
विभाग क्रमांक – 13 A, 13 D, 30 K
एक उमेदवार एकाच जागेसाठी दोन पक्षांकडून- (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election 2026)
– संदीप गायकवाड हे प्रभाग 30 ‘अ’ जागेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून
– नीलम म्हात्रे या प्रभाग 20 ब मधून शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून रिंगणात
2 जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे, त्या मुदतीनंतर या आकडेवारीत थोडाफार बदल अपेक्षित आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.