आरपीआयच्या बड्या नेत्याला निर्घृणपणे संपवलं; हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने केले वार, कारण अद्याप

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये आरपीआय कामगार आघाडीचे पदाधिकारी अनिल मोरे यांचं काल (बुधवारी, ता १३) रात्री धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात असलेल्या युवराज रेस्टॉरंटमध्ये  काल (बुधवारी, ता १३) रात्री अनिल मोरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने (Pimpri-Chinchwad Crime News) वार करून खून केला आहे. अनिल मोरे यांचा अज्ञात आरोपीनी हल्ला करून खून (Pimpri-Chinchwad Crime News) का केला हे अजून स्पष्ट झालं नाही. सध्या त्यांच्या मृतदेहावर वाय सी एम हॉस्पिटल मध्ये शव विच्छेदन करण्यात आले आहे. जोपर्यंत अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना पोलीस बेड्या ठोकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा पिंपरी-चिंचवड शहरातील आरपीआय कार्यकर्त्यांनी दिला आहे.(Pimpri-Chinchwad Crime News)

Pimpri-Chinchwad Crime News:  पोलिस प्रशासनाला आरोपी सापडत नसतील तर ही दुर्दैवी गोष्टी

रात्री साडे नऊ वाजता आरपीआय कामगार आघाडीचे पदाधिकारी अनिल मोरे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेला १२ तास उलटूनही, पोलिस प्रशासनाला आरोपी सापडत नसतील तर ही दुर्दैवी गोष्टी आहे. ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, त्या हॉटेलमध्ये हे सगळं घडलं रात्री ९ पासून ते २ वाजेपर्यंत उघडं असून तिथे रात्री दारूविक्री होते, यावर पोलिस काय करत आहेत. पोलिस देखील तिथे हॉटेलजवळ उभे राहतात, लोक येऊन तिथून दारू वगैरे घेऊन जातात तरी कारवाई झाली नाही, आम्ही जाऊन पोलिसांना सगळं सांगितल्यानंतर ते हॉटेल बंद झालं आहे. यामध्ये पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, जर कारवाई झाली नाही ते आरोपी अटक झाले नाही तर खूप मोठं आंदोलन होईल,  जो पर्यंत आरोपी पकडले गेले जात नाहीत. तोपर्यंत आम्ही इथून त्यांचा मृतदेह घेऊन जाणार नाही असंही आरपीआय कामगार आघाडी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष वैभव रोखडे यांनी म्हटलं आहे.(Pimpri-Chinchwad Crime News)

Pimpri-Chinchwad Crime News:  नेमकं काय घडलं?

तर मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. अनिल मोरे हे आरपीआय (आठवले गट) मध्ये सक्रिय होते आणि कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या हत्येची बातमी सगळीकडे पसरताच वायसीएम (YCM) रुग्णालय परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तर आरोपींना जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

प्राथमिक अंदाजानुसार अनिल मोरे यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा प्राझमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र अधिकृत कारण तपासण्यात येत आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरपीआयच्या वरिष्ठ नेत्यांनीही हजेरी लावली असून, संताप व्.क्त होत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.